Contract
(सूचना – कोणता खंड/स्तंभ अनिवार्य आहे हे समजून घेण्यासाठी किंवा कोणत्या स्तंभामध्ये काय माहिती भरायची आहे हे समजून घेण्यासाठी
कृपया खालील तक्ता दोन बघावा )
परवानगी व अनुज्ञा(लिव्ह अँड लायसन्स) भाडेकराराचा मसूदा
-
रकाना क्रमांक
शिर्षक
मुद्दा
अनिवार्य / वैकल्पित
रिक्त जागी भरावयाचा तपशील
-
-
सदर करारनामा………(1)………रोजी…………(2)………….येथे,यांचे दरम्यान करण्यात आला आहे.
अनिवार्य
(1)निष्पादनाचा दिनांक
(2)ठिकाण
-
अनुज्ञप्तीदात्याचे /अनुज्ञप्तीदात्यांचे (xxxxxxxxxx/ लिहून घेणार)
यांचे नाव आणि तपशील
नांव :………………………….(3)………………………….
वय:अंदाजे ……………(4) ……………. वर्षे, व्यवसाय……………. (5) …………
निवासस्थान …………………(6)……………………
स्थायी खाते क्रमांक (पॅन)………….. (6 क)…………
आधार ओळख क्रमांक(युआयडी)………… (6 ख)………यात पुढे ज्यांना “अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते” (लायसेन्सॉर)असे संबोधण्यात आले आहे अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते (लायसेन्सॉर) या संज्ञेचा अर्थ आणि यांच्या नावामध्ये त्याचे/तिचे/त्यांचे संबंधित वारस,उत्तराधिकारी, अभिहस्तांकिती, मृत्युपत्र व्यवस्थापक आणि xxxxxxx यांच्या देखील नावाचा समावेश करण्यात येईल) आणि
अनिवार्य
अनुज्ञप्तीदात्याचा (लायसेन्सॉर) तपशील
(3) नांव
(4) वय
(5) व्यवसाय
(6) निवासस्थान
(6क) स्थायी खाते क्रमांक (पॅन)
(6ख) आधार क्रमांक(युआयडी)
-
अनुज्ञप्तीधारक
(लायसेन्सी/लिहून देणार)
यांचे नाव आणि तपशील
नाव:……………………(7)……………………………..
वय:अंदाजे……………………(8)………….......वर्षे
व्यवसाय……………………..(9)………………….
स्थायी खाते क्रमांक (पॅन)……………… (10 क)…………..
आधार ओळख क्रमांक(युआयडी)…………………………. (10 ख)……… (यात यापुढे
ज्यांना “अनुज्ञप्तीधारक” (लायसेन्सी) संबोधले आहे आणि यामध्ये वर केवळ अनुज्ञप्तीधारकाचे /अनुज्ञप्तीधारकांचे (लायसेन्सी) नाव असेल)
अनिवार्य
अनुज्ञप्तीधारकाचा(लायसेन्सी) तपशील
(7) नांव
(8) वय
(9) व्यवसाय
(10)निवासस्थान
(10क)स्थायी खाते क्रमांक (पॅन)
(10ख) आधार क्रमांक(युआयडी)
1
ज्याअर्थी,अनुज्ञप्तीदात्याची/अनुज्ञप्तीदात्यांची (लायसेन्सॉर)अनुज्ञप्ती पुर्णपणे जप्त केलेली आहे किंवा तिचा ताबा घेतलेला आहे आणि किंवा अन्यथा अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते (लायसेन्सॉर) त्याखालील अनुसुचीमध्ये यूनिट म्हणून लेखी वर्णन केलेल्या सर्व बांधकाम केलेल्या भागाचा योग्य व पुरेसा हक्कदार आहे आणि तो,महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम,1999 च्या कलम 24 अन्वये संमती नि परवानगी (लिव्ह अँड लायसन्स) तत्वावर उक्त परिसर भाडयाने देण्यासाठी इच्छुक आहे/आहेत.
अनिवार्य
निरंक
2
आणि ज्याअर्थी अनुज्ञप्तीधारकास/अनुज्ञप्तीधारकांस (लायसेन्सी) येथे त्याच्या/ तिच्या/त्यांच्या……………….(10 ग)………………..वापरासाठी तात्पुरत्या जागेची गरज आहे तेव्हा अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी), अनुज्ञप्तीदात्याकडे/अनुज्ञप्तीदात्यांकडे (लायसेन्सॉर) यापुढे दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून,……………(12)………………..पासून सुरु होणा-या आणि ……………..(13)…………….रोजी संपणा-या………..(11)………. महिन्यांच्या कालावधीसाठी संमती नि परवानगी (लिव्ह अँड लायसन्स) तत्वावर उक्त जागा वापरण्याकरिता किंवा भाडयाने घेण्याकरिता सवलत मिळावी या विनंतीसह जाईल/जातील.
अनिवार्य
(10ग)निवासी/वाणिज्यिक
(11) कालावधी महिन्यांमध्ये
(12) सुरु होण्याचा दिनांक
(13) संपण्याचा दिनांक
3
आणि ज्याअर्थी, अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते(लायसेन्सॉर), अनुज्ञप्तीधारकास /अनुज्ञप्तीधारकांस (लायसेन्सी),यात यापुढे दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून,वर नमूद केलेल्या कालावधीसाठी संमती नि परवानगी (लिव्ह अँड लायसन्स) तत्वावर केवळ त्याच्या/तिच्या/त्यांच्या उपरोक्त निवासी प्रयोजनांसाठी उक्त अनुज्ञप्ती असलेली जागा वापरण्यासाठी किंवा भाडयाने देण्यासाठी परवानगी देण्याकरिता सहमती दर्शवील.
अनिवार्य
निरंक
4
त्याअर्थी आता,याव्दारे वर नमूद केलेल्या पक्षकारांकडून किंवा पक्षकारांदरम्यान सहमती असलेल्या,जाहीर केलेल्या आणि नोंदविलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
अनिवार्य
निरंक
4.1
कालावधी
1)असे की, अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते (लायसेन्सॉर),याव्दारे …………..(12)…………..पासून सुरु होणा-या……………(13)………… रोजी संपणा-या…………………11…………. महिन्याच्या कालावधीसाठी अनुज्ञप्तीधारकाच्या/अनुज्ञप्तीधारकांच्या (लायसेन्सी) हितार्थ,कोणतेही कुळवहिवाट हक्क किंवा कोणतेही इतर अधिकार,हक्क आणि हितसंबंध निर्माण केल्याखेरीज, अनुज्ञप्तीधारकास/अनुज्ञप्तीधारकांस (लायसेन्सी),अनुसूचीखाली लेखी वर्णन केल्याप्रमाणे अनुज्ञप्ती असलेली जागा ताब्यात घेण्यासाठी,परवानगी व अनुज्ञा (लिव्ह अँड लायसन्स )करार रद्द करण्याकरिता परवानगी देईल.
(11) महिन्यांचा कालावधी
(12) सुरु होण्याचा दिनांक
(13) संपण्याचा दिनांक
(14) प्रती महिना अनुज्ञप्ती
शुल्काची रक्कम
4.2
भाडे आणि ठेव
2.1)असे की,अनुज्ञप्तीधारक,अनुज्ञप्तीदात्यास/अनुज्ञप्तीदात्यांस (लायसेन्सॉर) उक्त अनुज्ञप्ती असलेल्या जागेच्या वापरासाठी भरपाई म्हणून प्रति महिना ……….14………… (अनुज्ञप्तीची रक्कम)प्रदान करील. ही रक्कम परवानगी व अनुज्ञा कराराच्या (लिव्ह अँड लायसन्स) संबंधित महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत प्रदेय असेल.
2.1,2.2,
2.3,किंवा
2.4 पैकी एक अनिवार्य आहे.
(14)प्रती महिना अनुज्ञप्ती
शुल्काची रक्कम
2.2)असे की,अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी),अनुज्ञप्तीदात्याला/अनुज्ञपतीदात्यांना (xxxxxxxxxx) उक्त अनुज्ञप्ती असलेल्या जागेच्या वापरासाठी भरपाई प्रति महिना …………14………(अनुज्ञप्तीची रक्कम ) रुपये आणि ….(15)……..रुपये ठेवीची व्याजरहित परतावायोग्य रक्कम प्रदान करील. मासिक भरपाईची रक्कम परवानगी व अनुज्ञा (लिव्ह ॲण्ड लायसन्स )कराराच्या संबंधित महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत प्रदेय असेल.
(14) प्रती महिना अनुज्ञप्ती
शुल्काची रक्कम
(15)ठेवीची व्याजरहित
परतावायोग्य रक्कम
2.3) असे की, अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी), अनुज्ञप्तीदात्याला /अनुज्ञप्तीदात्यांना (लायसेन्सॉर) उक्त अनुज्ञप्ती असलेल्या जागेच्या वापरासाठी भरपाई प्रति महिना……(14)………रुपये आणि……..(15)……रुपये ना परतावा ठेवीची रक्कम /अधिमुल्याची रक्कम प्रदान करील. मासिक भरपाईची रक्कम परवानगी व अनुज्ञा (लिव्ह ॲण्ड लायसन्स) कराराच्या संबंधित महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत प्रदेय असेल.
(14) प्रती महिना भाडे
शुल्काची रक्कम
(16)ना परतावा ठेवीची
व्याजरहित परतावायोग्य
रक्कम
2.4)असे की, अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी), अनुज्ञप्तीदात्याला /अनुज्ञप्तीदात्यांना (लायसेन्सॉर) उक्त अनुज्ञप्ती असलेल्या जागेच्या वापरासाठी…..(16)……… रुपये इतकी ना-परतावा ठेव रक्कम /अधिमुल्याची रक्कम भरपाई म्हणून प्रदान करील.
(16)ना परतावा ठेवीची
व्याजरहित परतावायोग्य
रक्कम
4.3
ठेवीचे प्रदान
3(क) अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी) हा अनुज्ञप्तीदात्याला (लायसेन्सॉर),
(एक)धनादेश क्रमांक………(17.1)………..धनादेशाचा दिनांक………..(18.1)…………
अनुज्ञप्तीधारकाच्या (लायसेन्सी) बँक खात्यावर आहरित केलेल्या या बँकेच्या नावासहित बँकेचे नाव……….(19.1)…… बँकेची शाखा…….(20.1)………आणि (दोन) धनादेश क्रमांक……………(17.2)……….धनादेशाचा दिनांक………(18.2)…अनुज्ञप्तीधारकाच्या (लायसेन्सी) बँक खात्यावर आहरित केलेल्या या बँकेच्या नावासहित बँकेचे नाव ……….((19.2)…. बँकेची शाखा…………(20.2)………… या धनादेश क्रमांकाव्दारे वर नमूद केल्याप्रमाणे वर नमूद केलेली ठेव/अधिमुल्याची रक्कम प्रदान केली आहे/प्रदान करील.
वरीलपैकी 2.2/2.3/
2.4 निवडले असल्यास त्यास लागु असेल,त्यानंतर आवश्यक असल्यास (दोन) वापरणे वैकल्पिक असेल
(17) धनादेश क्रमांक
(18) धनादेश दिनांक
(19) बँकेचे नाव
(20) शाखेचे नाव
परतावायोग्य ठेव
3(ख)अनुज्ञप्तीदात्याव्दारे/अनुज्ञप्तीदात्यांव्दारे(लायसेन्सॉर),अनुज्ञप्तीधारकास/
अनुज्ञप्तीधारकांस (लायसेन्सी) कोणतेही शिल्लक असणारी मासिक भरपाई,परिरक्षा अधिभार किंवा अनुज्ञप्तीधारकांव्दारे (लायसेन्सी) अंतर्भुत केलेल्या कोणत्याही प्रकारच्या निर्गामी रकमांची कपात केल्यानंतर,परतावायोग्य ठेव कराराच्या कालावधीच्या अखेरीस,यथास्थिति करार रद्द करतेवेळी, उक्त अनुज्ञप्ती असलेली जागा खाली करण्याच्या वेळी,अनुज्ञप्तीधारकाला (लायसेन्सी) परत करण्यात येईल.
वरीलपैकी 2.2निवडले
असल्यास त्यास लागु असेल,
4.4
परिरक्षा अधिभार (मेंटेनेन्स चार्ज )
4.1) असे की,उक्त जागेच्या बाबतीत,अनुज्ञप्तीदात्याव्दारे/अनुज्ञप्तीदात्यांव्दारे (लायसेन्सॉर) सर्व दर,कर,वसुली,निर्धारित कर,वहिवाट व्यतिरिक्त अधिभार इत्यादि अंतर्भुत असलेल्या सर्व निर्गामी रकमा प्रदान करण्यात येईल/येतील.
4.1 व 4.2 यापैकी
एक अनिवार्य आहे.
निरंक
4.2) असे की,अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी) उक्त अनुज्ञप्ती असलेल्या जागेच्या बाबतीत,सर्व परिरक्षा अधिभार सोसेल व त्याचे प्रदान करेल आणि त्यास उक्त जागेच्या बाबतीत सर्व दर,कर,वसुली निर्धारित कर, परिरक्षा अधिभार वहिवाट व्यतिरिक्त अधिभार इत्यादी अंतर्भुत असलेल्या इतर निर्गामी रकमा अनुज्ञप्तीदात्याकडून/अनुज्ञप्तीदात्यांकडून (लायसेन्सॉर) प्रदान करण्यात येईल/येतील.
निरंक
4.5
वापर
5)असे की,अनुज्ञप्ती असलेल्या जागा…………(10ग)……… (वाणिज्यिक/निवासी) प्रयोजनासाठी केवळ अनुज्ञप्तीधारकाव्दारे/अनुज्ञप्तीधारकांव्दारे (लायसेन्सी) वापरण्यात येईल. अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी) हा/हे विदयमान परिस्थितीमध्ये उक्त जागेचे परिरक्षण करील. उक्त जागेचे कोणत्याही कारणास्तव नुकसान झाल्यास आणि सर्वसाधारण झीज व तुट झाल्यास त्याच्या अधीन राहून अनुज्ञप्तीधारकाव्दारे (लायसेन्सी) त्याची दुरुस्ती करण्यात येईल. अनुज्ञप्तीधारकाने/अनुज्ञप्तीधारकांने (लायसेन्सी),उक्त जागेत ज्यामुळे उक्त इमारतीतील इतर भोगवटादारांना उपद्रव होईल किंवा होण्याची शक्यता आहे किंवा उक्त जागेच्या बाबतीत,अनुज्ञप्तीधारकाच्या/अनुज्ञप्तीधारकांच्या (लायसेन्सी) हक्काला कोणत्याही रितीने बाधा येणार नाही असे कोणतेही कृत्य करणार नाही. किंवा राज्यशासनाने किंवा केंद्रसरकारने प्रतिबंधित केलेली कोणतेही बेकायदेशीर कृती करणार नाही.
अनिवार्य
निरंक
4.6
फेरबदल
6)असे की,अनुज्ञप्तीधारक(लायसेन्सी) हा /हे अनुज्ञप्तीदात्याकडून /अनुज्ञप्तीदात्यांकडून (लायसेन्सॉर) लिखीत स्वरुपात पूर्व संमती घेतल्याशिवाय अनुज्ञप्ती असलेल्या जागेत कोणतेही फेरबदल किंवा बांधकामात भर किंवा व्यवस्था (अंतर्गत किंवा बाहय) करणार नाही किंवा त्यास तसे करण्याची परवानगी असणार नाही.
अनिवार्य
निरंक
4.7
भाडे न देणे
7) असे की,अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी) हा/हे कोणत्याही कुळवहिवाटाच्या हक्कासाठी दावा करणार नाही आणि त्यास,अनुज्ञप्ती असलेल्या जागेच्या बाबतीत किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या बाबतीत,कोणतीही अनुज्ञप्ती किंवा उपअनुज्ञप्तीसाठी हस्तांतरण करणे,अभिहस्तांतरीत करणे आणि पोट-भाडयाने देणे किंवा त्यास मान्यता देणे याबाबतचा कोणताही अधिकार असणार नाही आणि तो उक्त जागेच्या नावे गहाण ठेवणार नाही किंवा त्यावर कोणतेही कर्ज घेणार नाही.
अनिवार्य
निरंक
4.8
तपासणी
8) असे की,अनुज्ञप्तीदात्यामार्फत/अनुज्ञप्तीदात्यांमार्फत(लायसेन्सॉर), अनुज्ञप्तीधारकाला/ अनुज्ञप्तीधारकांना (लायसेन्सी) वाजवी नोटीस दिल्यावर,अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते (xxxxxxxxxx) यांना त्याच्या/तिच्या/त्यांच्या एकतर अनुज्ञप्ती असलेल्या जागेत प्रवेश करण्याचा अधिकार असेल किंवा प्राधिकृत प्रतिनिधींव्दारे वाजवी अंतराने अनुज्ञप्ती असलेल्या जागेमध्ये प्रवेश करण्याचा तिचे अवलोकन करण्याच्या आणि तिची तपासणी करण्याचा अधिकार असेल.
अनिवार्य
निरंक
4.9
रद्द करणे
9)असे की, जर अनुज्ञप्तीधारकाने/अनुज्ञप्तीधारकांनी (लायसेन्सी) येथे यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे मासिक भरपाई नियमित किंवा वेळेत प्रदान करण्यास कसूर केल्यास किंवा या कराराच्या कोणत्याही अटी,प्रसंविदा व शर्तींचा भंग केल्यास किंवा परवानगी व अनुज्ञा करार (लिव्ह अँड लायसन्स) प्रतिबंधित किंवा निर्बंधित करणारा कोणताही कायदा लादला गेला असेल किंवा त्यास अवरोध केला असेल तर,अनुज्ञप्तीधारकास /अनुज्ञप्तीधारकांस (लायसेन्सी) एक महिन्याची लेखी नोटीस देऊन याव्दारे दिलेली अनुज्ञप्ती परत करण्यास किंवा रद्द करण्यास हक्कदार असेल आणि अनुज्ञप्तीधारकालाही /अनुज्ञप्तीधारकांनाही (लायसेन्सी) ,यापूर्वी नमुद केल्याप्रमाणे अनुज्ञप्तीदत्याला/अनुज्ञप्तीदात्यांना (लायसेन्सॉर) एक महिन्याची लेखी नोटीस देऊन उक्त जागा रिकामी करण्याचा अधिकार आहे.
अनिवार्य
निरंक
4.10
ताब्यात घेणे
10)असे की,या कराराची मुदत संपल्यावर किंवा तो संपुष्टात आल्यावर किंवा रद्द केल्यावर,अनुज्ञप्तीधारकाने/अनुज्ञप्तीधारकांनी (लायसेन्सी) त्याच्या/ तिच्या/त्यांच्या सर्व वस्तु आणि मालकीच्या वस्तू यांसह विलंब न करता उक्त जागा त्वरित रिकामी करावी. या कराराची मुदत संपल्यावर किंवा करार लवकर समाप्त करण्यात आल्यावर उक्त जागेमधून जर अनुज्ञप्तीधारक (लायसेन्सी) तो स्वतः/ती स्वतः/ते आणि/ किंवा त्याच्या/तिच्या/त्याच्या चीज वस्तू काढून टाकण्यासाठी अयशस्वी झाल्यास किंवा त्यांनी दुर्लक्ष केल्यास, अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते(लायसेन्सॉर),अनुज्ञप्तीधारकाकडून/अनुज्ञप्तीधारकांकडून (लायसेन्सी) प्रतिदिन भरपाईच्या रकमेच्या दुप्पट दराने नुकसान वसूल करण्यास हक्कदार असेल आणि किंवा कायदयातील तरतुदींचा अवलंब न करता विकल्पाने अनुज्ञप्तीदाता/अनुज्ञप्तीदाते (लायसेन्सॉर) हे अनुज्ञप्ती असलेल्या जागेमधून अनुज्ञप्तीधारकाच्या/अनुज्ञप्तीधारकांच्या (लायसेन्सी) आणि त्याच्या/ तिच्या/त्यांच्या मालकीच्या वस्तू काढून टाकण्यासाठी हक्कदादर असेल.
अनिवार्य
निरंक
4.11
संकीर्ण
………………………………… (20क)……………………………………
वैकल्पिक
(20क) पक्षकार हे त्यांच्या आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही इतर अट/अटी व शर्त/शर्ती लिहू शकतो.
4.12
नोंदणी
11) हा करार नोंदणीकृत केला जाणार आहे आणि त्यासाठीचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क आणि आनुषांगिक आकारणी इत्यादीचा खर्च अनुज्ञप्तीदात्याकडून /अनुज्ञप्तीदात्यांकडून (लायसेन्सॉर)करण्यात येईल.
अनिवार्य
निरंक
5
मालमत्ता
अनुसूची
(सदनिकेचे अचूक वर्णन करणे हा या अभिलेखाचा विषय आहे)
तहसील……(30)……..आणि जिल्हा ………(31)……… यांच्या महसूल सिमांमध्ये स्थित असलेले किंवा …….(32)……महानगरपलिकेच्या स्थित असलेले भूखंड प्रकार…..(सीटीसी/सर्व्हेक्षण क्रमांक)………(26)……निर्देश क्रमांक…………(27)……….. हिस्सा क्रमांक ………(28)…… गावाचे नाव………(29)………….येथे जमिनीच्या उक्त भुखंडावर उभारलेल्या “………(25)…………”म्हणून ओळखल्या जाणा-या इमारत क्रमांक ………(24)……..याच्या ……….(23)…… मजल्यावर स्थित असणारे उभारलेल्या क्षेत्र ………..(22)…… यांवर मोजणी केल्या प्रमाणे युनिट क्रमांक……….(21 क)……….यांवरील ………..(21) सदनिका/दुकान/कार्यालय (यापैकी कोणतेही एक) धारण करणा-या युनिटच्या निवासी भागावर केलेले सर्व प्रकारचे बांधकाम.
अनिवार्य
(21)सदनिका/दुकान/कार्यालय (यापैकी कोणतेही एक)
(21क)युनिट चा क्रमांक
(22)क्षेत्र
(23 क)युनिट
(23)मजला क्रमांक
(24)इमारत क्रमांक (कोणतेही असल्यास)
(25)इमारतीचे नाव(कोणतेही असल्यास)
(26)भुखंड प्रकार(सीटीसी/सर्व्हेक्षण क्रमांक)
(27)निर्देश क्रमांक
(28)हिस्सा क्रमांक (कोणतेही असल्यास)
(29)गावाचे नाव
(30)तालुक्याचे नाव
(31)जिल्हयाचे नाव
(32)महानगरपालिकेचे नाव
(सर्व ईटॅलिक शब्द महानगरपालिकेस लागु असेल)
6
ज्याच्या साक्षीने पक्षकारांनी दिनांक….……रोजी वर लिहून घेतल्याप्रमाणे,स्वाक्षरी केलेल्या साक्षीदारांच्या उपस्थितीत,येथे त्यांच्या अंगठयाचा ठसा/डिजीटल स्वाक्षरी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करुन,अनुक्रमे त्यांच्या स्वाक्ष-या निश्चित केल्या आहे आणि त्यास अनुमती दिली आहे.
अनिवार्य
निरंक
7.
निष्पादन
अनुज्ञप्तीदाता
(लायसेन्सॉर)
………………(3)…………………
स्वाक्षरी
अनिवार्य
(3)अनुज्ञप्तीदात्याचे/
अनुज्ञप्तीदात्यांचे नाव
(7)अनुज्ञप्तीधारकाचे/
अनुज्ञप्तीधारकांचे नाव
अनुज्ञप्तीधारक
(लायसेन्सी)
……………(7)……………….
स्वाक्षरी
8
साक्षीदार
साक्षीदाराचे नाव
नाव : (34.1)
निवासस्थान : (35.1)
आधार क्रमांक(युआयडी) (36.1)
स्वाक्षरी
अनिवार्य
साक्षीदाराचा तपशील
(34) नाव
(35) पत्ता
(36) आधार क्रमांक(युआयडी)
साक्षीदाराचे नाव
नाव : (34.2)
निवासस्थान : (35.2)
आधार क्रमांक(युआयडी) (36.2)
स्वाक्षरी
अनिवार्य